• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना एनआयएकडून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 17, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मनसुख हिरण हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना एनआयएने अटक केली आहे. शर्मा यांच्या अंधेरी येथील घरी छापा टाकला होता. त्यानंतर दुपारच्या सुमारास प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली.

एनआयएच्या ताब्यातील सचिन वाझे आणि संतोष शेलार यांच्या चौकशीत प्रदीप शर्मा यांचं नाव आल्याने एनआयएने अटकेची कारवाई केली आहे. मनसुख हिरण यांच्या हत्येत सहभागी असल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप शर्मा यांच्यावर आहे. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंनतर अटक होणारे प्रदीप शर्मा हे मुंबई पोलिसातील दुसरे मोठे अधिकारी आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. ही कार व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मालकीची होती. त्यांची चौकशी सुरू असतानाच त्यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणात एनआयएनं सविस्तर तपास केल्यानंतर मनसुख हिरेन यांची हत्या झाली असून त्यामध्ये सचिन वाझे यांच्यासह मुंबई पोलिसातील दोन कर्मचारी आणि एक बुकी यांचा हात असल्याची बाब स्पष्ट झाली. त्यानुसार त्यांना एनआयएनं अटक केली. त्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात झालेली ही मोठी कारवाई ठरली आहे.

प्रदीप शर्मा हे 1983 साली पोलीस सेवेत रुजू झाले होते. पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी त्यांची ओळख आहे. प्रदीप शर्मा यांनी 312 गुंडांचा एन्काऊंट केला आहे. कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. शर्मा यांना 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबित करण्यात आले होते. 2017 मध्ये आरोपांतून क्लीनचिट मिळाली. 2017 साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली होती. त्यांनी 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा दिला. नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

अँटिलिया स्फोटकं आणि मनसुख हिरण हत्या प्रकरणात आतापर्यंत प्रदीप शर्मा यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस दलातून निलंबित झालेले सचिन वाझे, रियाज काझी, सुनील माने यांच्यासह विनायक शिंदे, संतोष शेलार, आनंद यादव यांचा समावेश आहे.


 

 

Previous Post

शिवसेना भवनाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना प्रसाद मिळणारच – खा.संजय राऊत

Next Post

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा – आ. अतुल भातखळकर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवसेनेने आता सामना बंद करून बाबरनामा काढावा - आ. अतुल भातखळकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना
1xbet russia

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 
1xbet russia

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026
अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार
1xbet russia

अमळनेर शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार

July 31, 2026
अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
1xbet russia

अंजनी धरणातून ५५०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

July 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांची हतनूर धरणास भेट व पहाणी; परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना

July 31, 2026
६५ वर्षीय महिलेची क्रूर हत्या: मृतदेहावर बलात्कार, आरोपी विवस्त्र पळून गेला 

जळगाव शहरात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून अत्याचार; पतीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल

July 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon