मुंबई (वृत्तसंस्था ) राज्यातील आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक यांचा बेमुदत संप सुरूच राहणार आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत आशा कर्मचारी,गटप्रवर्तक यांच्या मागण्यांवर कुठलाही तोडगा न निघाल्याने राज्यातील बेमुदत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात 72 हजार अशा वर्कर,गटप्रवर्तक आहेत.कोरोना काळात या कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावे लागत आहे. अश्यात सरकारने कोरोना भत्ता वाढ करावी आणि सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे ही मागणी करत आज राज्यातील आशा कर्मचारी आणि गटप्रवर्तक संघर्ष समितीचे शिष्टमंडळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटले. मात्र कोरोना स्थिती असल्याने आर्थिक मदत करता येणे शक्य नसल्याचे आरोग्य मंत्री यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं आहे. दरम्यान आपल्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत राज्यभर बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा या संघर्ष समितीने दिला आहे.