• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ओसरली ! ; ४ तालुक्यांमध्ये ५० च्या आत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 16, 2021
in आरोग्य, कोरोना, जळगाव, महाराष्ट्र
0

प्रशासनाच्या प्रभावी उपायांमुळे ५ तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या शंभरीच्या आत

जळगाव;- आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या प्रभावी उपायांमुळे जिल्ह्यातील पंधरापैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या 100 च्या आत तर चार तालुक्यात 50 च्या आत आली ही दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असून सद्य:स्थितीत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णसंख्या 1733 पर्यंत खाली आली आहे.
जळगाव जिल्हा अनलॉकच्या टप्पा-1 मध्ये असून भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हावासियांनी कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जळगाव जिल्ह्यात सक्रीय रुग्णसंख्या 12 हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवून बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेणे, कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी करणे आदि उपाययोजना तातडीने राबविल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 12 हजारपर्यंत गेलेली सक्रीय रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली असून ती आता 1733 पर्यंत खाली आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील जळगाव शहर, भुसावळ, चोपडा या तीन ठिकाणी सक्रीय रुग्णसंख्या हजाराच्यावर गेली होती तर उर्वरित तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या पाचशे ते हजाराच्या जवळपास पोहोचली होती. मात्र सध्या जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पाच तालुक्यात सक्रीय रुग्णसंख्या ही शंभरच्या आत आली असून चार तालुक्यात ही रुग्ण संख्या 50 पेक्षाही कमी झाली आहे. जळगाव शहरासह भुसावळ, एरंडोल, रावेर, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यात रुग्णसंख्या 100 पेक्षा अधिक आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्णपणे रोखण्यासाठी महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पोलीस व महसुल प्रशासनासह आरोग्य व इतर शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभत असून नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करुन कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.

जळगाव शहरात -152, जळगाव तालुक्यात (ग्रामीण )-79, भुसावळ-165, अमळनेर-45, चोपडा-55, पाचोरा-94, भडगाव-30, धरणगाव-24, यावल-83, एरंडोल-201, जामनेर-144, रावेर-105, पारोळा-46, चाळीसगाव-377, मुक्ताईनगर-61, बोदवड-53 व इतर जिल्ह्यातील-19 असे एकूण 1 हजार 733 रुग्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.


 

 

Previous Post

तर अशा गोष्टींमधून राजकारणाचा वास येत आहे का? – प्रवीण दरेकर

Next Post

मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र : चर्चा मात्र गुलदस्त्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुंबईत महाविकास आघाडीचे नेते एकत्र : चर्चा मात्र गुलदस्त्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार
1xbet russia

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती
1xbet russia

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

March 1, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा 

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

बेरोजगारीविरोधात समाज दमदार पाऊले टाकणार

March 1, 2026
महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे एकदिवसीय राज्यस्तरीय संमेलन; मान्यवरांची उपस्थिती

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon