जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील शिवकॉलनी भागात असलेल्या बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न हेल्मेटधारी चोरट्याने करताच अलार्म वाजल्याने त्याने तेथून काढता पाय घेतल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली असून या मशीनमध्ये सुमारे दहा लाखांची रोकड असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.