पाचोरा – भडगाव रस्त्यावरील अंतुर्ली फाट्याजवळील घटना
पाचोरा(प्रतिनिधी) ;- भडगाव रोडवरील रस्त्यावर एका पॅजो रिक्षाला धडक देऊन अज्ञात वाहनधारक फरार झाला आहे या अपघातात शेंदुर्णीचे दोघे जागेवर ठार झाले.
पाचोरा – भडगाव रस्त्यावर बांबरुडमहादेवाचे गावा नजिक अंतुर्ली फाट्याच्या पुढे शेंदुर्णी येथील पॅजो रिक्षाला एका अद्यात वाहनाने जोरदार धडक देऊन वाहनधारक फरार झाला या अपघातात पॅजो रिक्षाचा चालक व प्रवासी जागीच ठार झाला यात एका मयताची ओळख पटली असून त्याचे नाव भालचंद्र नरसिंह परदेशी रा. शेंदुर्णी असे त्याच्या खिशातील आधारकार्ड वरुन ओळख झाली असल्याचे कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी सांगितले. मयताच्या घरी निरोप अॅब्लुलन्स चालक निळु पाटील व इतरांना दिला आहे. अपघात झालेल्या पॅजो रिक्षामध्ये किराणा सामान मोठ्या प्रमाणावर होता. या अपघातात घटनास्थळी कॉग्रेस पदाधिकारी मदत कार्यात होते. पोलीस उपनिरीक्षक चौबे सह इतर सहकारी पोलीस होते
अपघात दोन जागीच ठार झाल्याचे वृत्त असून अपघातग्रस्त जखमींना मदत करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसह पोलीस दाखल झाले होते.