जळगाव ;- एप्रिल महिन्यात जबडा व कान दुखीने त्रस्त ३६ वर्षीय रूग्णाला म्युकरमायकोसिसची शक्यता लक्षात घेउन केलेली शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आणि जबडयावरील या शस्त्रक्रियेने पुढील धोका टळला.
सध्या म्युकोरमायकोसिस आजाराने थैमान माजवले आहे यातच डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालय अधिग्रहीत करून मोफत उपचारास सूरूवात झाली आहे. परंतू त्या आधिही एप्रिल महिन्यातच दुस—या आठवडयात कान नाक घसा तज्ञ डॉ विक्रांत वझे यांच्या कडे जळगावातील ३६ वर्षीय युवक जबडा व कान दुखत असल्याचे सांगून दाखल झाला. रूग्णांचे जबडयातील दात हालत होते तसेच पस व पु चा विर्सगाने त्रस्त रूग्णास प्राथमिक तपासणी करत असतांना डॉ. वझे यांना सदर युवकास म्युकोरमायकोसिसची शंका आली. त्यांनी विश्वासात घेउन रूग्णांस माहिती विचारली असता मार्च महिन्यात सदर युवकास कोविड होउन गेलेला होता. तसेच त्याला मधुमेहाचा त्रास देखिल असल्याचे त्याने सांगीतले. डॉ. वझे यांनी त्याला म्युकोरमायकोसिसची शक्यता वाटत असून पुढील तपासण्याकरता अॅडमिट होण्यास सांगीतले. यानंतर अत्याधुनिक मायक्रोस्कोप, सी.टी. स्कॅन, एम आर आय, रक्त लघवी इ चाचण्या केल्यानंतर या आजाराचे निदान झाल्यावर मुख कर्करोग तज्ञ डॉ. तनूज पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्यात आली. या रूग्णाच्या जबडयावर शस्त्रक्रिया करून काळी बूरशी काढल्याने डोळा मेंदू सुरक्षित राहीला जवळपास चार तास ही शस्त्रक्रिया चालली आणि पुढील धोका टळला.
यांनी केली शस्त्रक्रिया डॉ.विक्रांत वझे यांच्यासोबत डॉ अनुश्री अग्रवाल, डॉ. हर्षल महाजन हे नाक कान घसा तज्ञ,डॉ.तनुज पाटील मुख व कर्करोग शल्यचिकीत्सक,डॉ शितल ढाके, डॉ. ॠतुराज काकड, डॉ. दिनेश ललवाणी भुलरोग तज्ञ यांनी या शस्त्रक्रियेत सहभाग नोदंवला.
रूग्णालयातील फिजीशियन डॉ. चंद्रया कांते, डॉ पाराजी बाचेवार, डॉ. सी.डी सारंग यांच्या मदतीने सुरूवातीला रूग्णास स्टेबल करण्यात आले व फिटनेस मिळाल्यावर शस्त्रक्रिया करतांना सदर रूग्णांचा जबडयाचा सर्व भाग व नाकाचा फलोर यावर सगळीकडे म्युकरचा फैलाव झालेला आढळून आला.डिसीसस्प्रीन एरीया तयार केल्यानंतर जो काही हेल्थी इश्युज होता तो परत उपयोागात आणून फलोअर ऑफ द रिजल कॅज्युलीटी आणि रूप ऑफ द माउथचे रिकस्ट्रक्शन केले जेणेकरून नाका तोंडातील सेप्रेशन तसेच राहावे. रूग्ण २० ते २२ दिवस होता.रूग्ण अत्यंत गरीब होता. योजना उपलब्ध नव्हती अशातचे नागरिकांनी देखिल प्रतिसाद देत निधी गोळा केला.
मला मार्च २१ मध्ये कोविड झाला आजारातून बरे झाल्यावर एप्रिलच्या दुस—याच आठवडयात म्युकरमायकोसिसचा त्रास जाणवू लागला. मी कान नाक घसा तज्ञ डॉ. विक्रांत वझे यांना भेटलो. त्यावेळी योजना लागू नव्हती त्यामूळे या आजारावरचा प्रचंड खर्च कसा भागवायचा यक्ष प्रश्न होता. डॉ. वझे यांनी रूग्णालयातील खर्च लागणार नाही पण इजेंक्शन व इतर खर्च तुम्हाला करावा लागेल असे सांगीतले. मी इलेक्ट्रीकल दुकानात कामाला घरात तिन लहान मुले व बायको अशी दहा तोंडे आता पुढे कसे होणार या चितेंत असतांना मोठा खर्च भागवण्यासाठी मित्रांनी मदत केली. एप्रिलच्या दुस—या आठवडयात विविध चाचण्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध असल्याने कुठलेच विघ्न आले नाही. यानंतर जवळपास १५ दिवस मी येथे उपचार घेतले. येथील डॉ. विक्रात वझे यांचेसह सर्वच डॉक्टर सेवाभावी तसेच कर्मचा—यांनी केलेले सहकार्य यामूळे त्यांच्या रूपात देवच मदतीला धावून आला होता. दिगंबर रायसिंग रूग्णांचे मनोगत
म्युकरमायकोसिस या आजारावर उपचारासाठी येथे स्वतंत्र लॅब, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर,कान नाक घसा तज्ञांच्या मदतीला दंत मुखरोग तज्ञ, सर्जन,भुलरोग तज्ञ आणि फिजिशियची टीम तर उपलब्ध आहेच शिवाय सी.टी.स्कॅन, एम आर आयची देखिल व्यवस्था एकाच छताखाली केली आहे. सूसज्ज असा वार्ड म्युकरमायकोसिसच्या रूग्णांसाठी निर्माण केला असून तातडीने उपचार व शस्त्रक्रिया मिळत असल्याने रूग्णांचा ओढा डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाकडे दिसून येत आहे.