शासनामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन

एरंडोल ;- तालुक्यातील तळई येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या भुषण पाटील आणि विक्रम चौधरी यांच्या कुटूंबियांची आज पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन दोन्ही कुटुंबियांचे सात्वंन केले. त्यांच्या कुटूंबियांना शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन देऊन एरंडोलचे प्रांताधिकारी विनय गोसावी आणि तहसीलदार अर्चना खेतमाळीस यांना सूचना दिल्या .
याप्रसंगी पंचायत समिती सभापती रोकडे, उपसभापती अनिल महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, तहसीलदार अर्चना खेतमाळीस, वासुदेव पाटील, जगदीश पाटील, हिम्मतराव पाटील, रवींद्र चौधरी, ओंकार पाटील, तळईचे सरपंच संभाजी वाघ, ग्रामपंचायत सदस्य रतन पाटील, पोपटराव पाटील यांच्यासह भूषण आणि विक्रमचे कुटूंबिय व ग्रामस्थ उपस्थित होते.







