• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांची पाच लाखांची मदत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – मुंबईतल्या मालाड मालवणी येथे इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या रहिवाशांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची तसेच जखमीच्या उपचारांचा खर्च करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या दुर्घटनेबद्धल मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला तसेच जखमी रहिवाशांची कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पालिका रुग्णालय (शताब्दी रुग्णालय) येथे जाऊन विचारपूस केली. यावेळी पालक मंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी काल रात्रीच या घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली तसेच मदत व बचाव कार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले.अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचाव कार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले.

मुंबईतल्या मालाड भागात इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात लोक जखमी झाले आहेत. मालाड पश्चिमेकडे असलेल्या मालवणी भागात ही इमारत होती. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत जखमींवर उपचार सुरू असून घटनास्थळी अग्निशमन दलाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

मुंबईत बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे सगळं जनजीवन विस्कळीत झालं. अशात मालाडमध्ये रात्री उशिराच्या सुमारास ही इमारत कोसळली. मालवणी भागात असलेली ही इमारत शेजी असलेल्या घरांवर कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून मृतांची संख्या वाढण्याचीही भीती व्यक्त होते आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हेदेखील त्या ठिकाणी पोहचले. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळली अशी माहिती त्यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री 11.30 च्या दरम्यान घडली. सुरूवातीला आसपासच्या लोकांनी एकत्र येत 16 लोकांना वाचवलं. अद्यापही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असावेत अशी भीती व्यक्त होते आहे. ही चार मजली इमारत होती असंही पोलिसांनी सांगितलं आहे.


 

 

Previous Post

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची – संजय राऊत

Next Post

महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील – चंद्रकांत पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महापालिका निवडणुकीत मुंबईकर शिवसेनेला जागा दाखवून देतील - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा
1xbet russia

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाच्या संशोधनातून डॉ. माधुरी वाणी यांना पीएच.डी. पदवी

September 17, 2026
पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव
1xbet russia

पर्यावरणपूरक संदेश अन् संकल्पनांची जोड: मनपाच्या मानाच्या गणपतीचा यंदा अनोखा उत्सव

September 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

आर्थिक स्वातंत्र्य हा पर्याय’ गोदावरी आयएमआरमध्ये महिला आर्थिक सक्षमीकरणावर कार्यशाळा

September 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

महादेव हॉस्पिटलमध्ये दोन चिमुकल्यांना मिळाले नवजीवन

September 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon