पाचोरा (प्रतिनिधी ) शहरातील हुतात्मा राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्ताने कोरोना योद्धांचा अर्थात पाचोरा शहर ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवक आणि सेवकांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच पाचोरा तालुका आरोग्य अधिकारी डॉ समाधान वाघ, पाचोरा ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ अमित साळूंखे, डॉ गवळी आरोग्य सेविका भारती पाटील,जिजाबाई वाडेकर, वनिता जाधव, दीपाली भावसार, भिलाबाई ढोले, आकाश ठाकूर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संजय वाघ, नितीन तावडे, अज़हर खान, विकास पाटील विजय पाटील, रंजीत पाटील, अभिजीत पवार, सुदर्शन महाजन, पंकज गढरी, उमेश ऐरंडे वासु महाजन ए. बी.अहीरे, नान देवरे, भागवत महालपुरेहे उपस्थित होते.