जळगाव(प्रतिनिधी ) आयुष्यभर विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देत बेरीज- वजाबाकी शिकविणार्या गुरुजींवर वयाच्या ८०व्या वर्षी एन्जीओप्लास्टी करण्यात आली.. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील हृदयालयाच्या टीमने ती यशस्वी करत गुरुजींना त्यांच्या वाढदिवशीच पुढच्या आयुष्यातील बेरजेचे गिफ्ट दिले.
रावेर तालुक्यातील मस्कावद येथील गुणवंत तुकाराम पाटील (वय ८०) हे निवृत्त शिक्षक. आयुष्याचे गणित देखील त्यांनी अचूक सोडविले. मात्र, वृद्धापकाळात गुरुजींना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवायला लागला.. अचानक स्ट्रोकही येत होते, त्यासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील मेडिसीन तज्ज्ञ डॉ. पाराजी बाचेवर यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर हृदयालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
हृदयालयात गुणवंत पाटलांचा ईसीजी, टू-डी इको करण्यात आला, त्यात सायलेंट हार्ट अॅटेक येवून गेल्याची शक्यता डॉक्टरांना जाणवली.. त्यामुळे एन्जीओग्राफी करावी लागेल असे डॉक्टरांनी पाटील यांच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी संमती दिल्यावर लगेचच एन्जीओग्राफी झाली आणि त्यात हृदयाला रक्त पुरवठा करणारी डाव्या बाजूची मुख्य रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असल्याचे निर्दशनास आले, त्यानंतर गुरुंजीची एन्जोप्लास्टी करण्यात आली, याप्रसंगी कार्डियाक तज्ज्ञ डॉ.प्रदीप देवकते, डॉ.प्रियंका भालके, डॉ.ऋतुराज शिर्के यांचे सहकार्य लाभले.
गप्पांची मैफिली रंगली आणि यशस्वी झाली एन्जीओप्लास्टी
गुणवंत गुरुजी हे खुप धीराचे आहे, त्यामुळे रुग्णालयाच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला त्यांना वेळ लागला नाही. त्यामुळे एन्जीओप्लास्टीसारख्या शस्त्रक्रियेदरम्यान गुरुजींना डॉ. हर्षा देशपांडे यांनी लोकल भुल दिली, यामुळे त्यांना डॉक्टरांशी संवाद साधणे शक्य झाले आणि गप्पांची मैफल संपत नाही तोच एन्जीओप्लास्टीची प्रक्रिया देखील यशस्वीरित्या पूर्ण झाली. विशेषत ३ जून हा गुरुजींचा जन्मदिवस असून तो हृदयालयात साजरा करण्यात आला तसेच उपस्थीतांनी गुरुजींना निरोगी आणि दिर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.