मुंबई( वृत्तसंस्था ) ;- राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. या भेटीत नेमक्या कोण्या विषयावर चर्चा झाली याचे कारण स्पष्ट झाले नाही . मात्र ट्विटरवर एकनाथराव खडसे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेटीचे छायाचित्र खा. सुप्रियाताई सुळे यांनी शेअर केले आहे.








