जळगाव;- व्यवसायाने रिक्षाचालक असणाऱ्या एका ३६ वर्षीय रिक्षाचालकाने रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. रतिलाल कृष्णा जाधव (वय-३६) रा. हरीविठ्ठल नगर असे मयत तरूणाचे नाव आहे.
सावखेडा शिवारात गिरणा पंपींग रेाडवरील रेल्वेपूला जवळ अज्ञात तरुण रेल्वेखाली आल्याची खबर सहाय्यक फौजदार अनिल फेगडे यांच्यासह तालूका पोलिस यांना मिळाली होती . त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या कपड्यांची तपासणी करीत असताना पाकिटात असलेल्या कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली रतिलाल यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ पंकज, पत्नी जान्हवी, मुलगा रितेश (वय-८), दोन बहीणी असा परिवार आहे.