यावल;- तालुक्यातील मनवेल येथील शेतमजूर महिलांनी रोजंदारीत वाढ करण्यासाठी आज दि.7सोमवार रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायतवर मोर्चा काढुन सरपंच जयसिंग सोनवणे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन दिले.
शेतमजूर महिलांना शेतात दिवसभर काम करुन शंभर रुपये रोज मिळत आहे.वाढत्या महागाई मुळे शंभर रुपये रोज परवड नाही रोजंदारीत वाढ करण्यासाठी दगडी व मनवेल येथील महिलांनी दोन दिवसापासुन कामावर बहिष्कार टाकला असुन कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे सतंप्त महिलांनी आज ग्रामपंचायत मध्ये येऊन ग्रामपंचायतच्या सरपंच यांना निवेदन देऊन रोजंदारीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केली.
मनवेल ग्रामपंचायतची आज मासिक सभा सुरु होती.सभा संपल्यावर शेतमजुर महिला व मुकडदम यांनी रोजंदारीत वाढ करण्यात यावे यासाठी निवेदन दिले. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत गावात दवंडी देण्यात येईल व गावातील शेतकऱ्यांशी रोजंदारीत वाढ करण्या बाबत दि.८जुन2021रोजी ग्रामपंचायत कार्यालयात चर्चा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.रोजंदारीत वाढ करण्यासाठी शंभरच्यावर संख्येने दगडी व मनवेल येथील लह्याबाई भिल,कल्पना कोळी,कमलबाई कोळी,वत्सलाबाई कोळी,वत्सलाबाई भालेराव सुनिता भालेरावसह महिला उपस्थीत होत्या.