• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘लॉकडाऊन’च्या काळात शहरातील नद्यांमधील प्रदूषण घटले का?

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 10, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – शहरातील पवना, इंद्रायणी, मुळा नद्यांच्या पाण्याच्या प्रदूषणाची स्थिती करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात सुधारली आहे का, याबाबत तपासणी अहवाल उपक्रम इन्व्हर्नमेंट कॉन्झर्वेशन असोसिएशन (ईसीए) आणि टाटा मोटर्स यांनी संयुक्तपणे हाती घेतला आहे. देशभरात सध्या 21 दिवसांचा लॉकडाऊन आहे. या 21 दिवसांच्या काळात शहरातील नद्यांच्या प्रदूषणाची स्थिती सुधारली आहे का, याचा अभ्यास केला जात आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या परवानगीने इसीए व टाटा मोटर्स एकत्रितपणे पिंपरी-चिंचवड महापालिका पर्यावरण विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवत आहे, अशी माहिती ईसीएसचे चेअरमन विकास पाटील यांनी दिली.महापालिका पर्यावरण विभागाकडून संचारबंदीच्या कालावधीत अधिकृत 5 परवाने घेऊन ही कार्यवाही करण्यात आली. ईसीएकडून दोघे आणि टाटा मोटर्सकडून दोघांनी 10 ठिकाणी जाऊन इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीच्या पात्रातील पाण्याचे नमुने घेतले आहेत. ते सर्व नमुने टाटा मोटर्स कंपनीच्या पाणी तपासणी विभागाकडे सुपूर्द केले आहेत. टाटा मोटर्सकडून दिवसभर प्रवासासाठी एक वाहन व चालक उपलब्ध केला गेला होता. लागणारे आवश्‍यक साहित्य व दुपारच्या जेवणाची सोय सुद्धा केली होती. दुसरा नमुना गुरुवारी (दि. 9) घेतला. आता तिसरा नमुना 14 तारखेला संबंधितांकडून पूर्वीच्या ठिकाणांवर जाऊन घेतला जाणार आहे. सर्व नमुने तपासणीनंतर येणाऱ्या अहवालाचा अभ्यास केला जाणार आहे. शहरातील उद्योगधंदे 21 दिवस बंद राहिल्याने मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषणात घट झाली आहे की नाही ? याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. कोणत्या नदीत, कोणत्या परिसरात नागरी वस्तीमधील सांडपाण्याने जास्त प्रदूषण होत आहे ?, हा अहवाल फक्‍त महापालिका नदी संवर्धन कामासाठी संदर्भ म्हणून वापरला जाणार आहे. गेल्या 21 दिवसांत नदी प्रदूषणाबाबत काय काय बदल झाले, त्याचा अभ्यास यामध्ये होणार आहे. शहरातील नद्या ‘एमआयडीसी’कडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत का ? त्याचाही अभ्यास केला जाणार आहे. देशभरातील ‘लॉकडाऊन’च्या काळात शहरातील तिन्ही नद्यांच्या प्रदूषणाची स्थिती सुधारली आहे का, याची तपासणी करण्यासाठी पाण्याचे नमुने घेतले जात आहे. त्याबाबतचा अहवाल 25 तारखेपर्यंत अपेक्षित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका पर्यावरण विभागाकडे सादर केला जाईल.- विकास पाटील, चेअरमन, इसीए.


 

 

Previous Post

राज्यांनी लॉक डाऊनची अंमलबजावणी योग्य करावी – केंद्रीय आरोग्यमंत्री

Next Post

आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर वाढती आव्हानं

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर वाढती आव्हानं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  
1xbet russia

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू
1xbet russia

विद्युत हिटरमुळे विजेचा जोरदार धक्का लागून कामगाराचा मृत्यू

March 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

७० वर्षीय वृद्धेचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या जळगावच्या महिलांना अटक

March 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त..!  

March 12, 2026
शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी कंत्राटी आरोग्य सेविकेला केले सेवेतून कमी, सीईओंची कारवाई

March 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon