मुक्ताईनगर;- घरासमोर लावलेली मालवाहतूक बोलेरो पिकअप व्हॅन अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
शेख आरीफ शेख हमीद रा. घोडपी, मदीना नगर मुक्ताईनगर यांच्या मालकीची बोलेरो पिकअप वाहन (एमएच ४६ एएफ ७४५) वाहन घरासमोर लावली होती. मध्यरात्री संशयित आसीफ मोहंमद मिरशेख रा. पहूर ता. जामनेर, आसीफ नूर मोहंमद बागवान रा. सिडफार्म मुक्ताईनगर जि.जळगाव आणि एक अनोळखी व्यक्ती या तिघांनी घरासमोर लावलेली वाहन चोरून नेल्याचे बुधवारी सकाळी उघडकीला आले. शेख आरीफ यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक श्रावण जवरे करीत आहे.







