चाळीसगाव;- तालुक्यातील शामवाडी शिवारात शेतकऱ्याच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार घडला आहे.

गजानन पाटीलरा. शामवाडी शिवार ता.चाळीसगाव हे शेतकरी असून त्यांच्याकडे (एमएम १९ एएल ९४८७) क्रमांकाची दुचाकी पार्किंगला लावली होती. २ जून रोजी सकाळी ४ वाजेच्यापुर्वी अज्ञात चोरट्यांनी ८ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज नाईक करीत आहे.






