चाळीसगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या– नेतृत्वा्खालील केंद्र सरकारला ७ वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमिताने चाळीसगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्यावतीने आयोजित सेवा सप्ताहाच्या अनुषंगाने चाळीसगाव शहरातील मोकळ्या ओपन स्पेस स्वच्छता, नालेसफाई, प्रभागातील छोट्या मोठ्या कामांसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या वतीने ५ जेसीबी मशिन्स चे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली होती. त्यांचाच आदर्श घेऊन राजकारण, गटा तटाच्या पलीकडे जाऊन सर्वपक्षीय नगरसेवकांनी, विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपले चाळीसगाव शहर स्वछ, सुंदर व निरोगी करण्यासाठी या जेसीबीच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वच्छतेची कामे करावीत, यासाठी मागणी आल्यास अजून मशीन मी उपलब्ध करून देईल अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.
आज आमदार मंगेश चव्हाण यांनी ५ जेसीबी मशिन्स नगरपालिका व शहरासाठी उपलब्ध करून दिल्याने शहर वासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, गटनेते संजय रतनसिंग पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, शहर विकास आघाडी गटनेते सुरेश स्वार, महिला आघाडी शहराध्यक्षा नगरसेविका सौ.संगीता गवळी, जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, अण्णा कोळी, मेरा गाव मेरा तीर्थ चे प्रवर्तक विजय शर्मा, खुशाल पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई शर्मा. नगरसेविका विजयाताई पवार, चिराग शेख, आंनद खरात, नितीन पाटील, भास्कर पाटील, चंद्रकांत तायडे, चिराग शेख, काकासाहेब घोडे, रमेश सोनवणे सर, सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, योगेश खंडेलवाल, अमोल चव्हाण, इम्रान मेम्बर, सचिन दायमा, प्रवीण मराठे, रोहन सूर्यवंशी, अभय वाघ, गौरव पुरकर, सचिन आव्हाड, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेसाठी आपापल्या प्रभागातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी तसेच जेसीबी मशीनसाठी संपर्क क्रमांक – संदीप भावसार – 9763555544 संपर्क साधावा असे आवाहन आ. मंगेश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.