मुंबई (वृत्तसंस्था) – सध्याचा भारत हा फक्त काँग्रेसच्या आणि नेहरूंच्या पुण्याई वर चालतोय अस वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नेहरू आणि गांधी यांच्याबाबत राऊत यांचे मत बाळासाहेब ठाकरे यांनी ऐकले तर ते स्वर्गातून त्यांच्या थोबाडीत मारतील, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली.

मराठा आरक्षणाबाबत जे जे संघर्ष करतील, त्यांच्यासोबत भाजप असेल, अशी ग्वाही पाटील यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर संभाजीराजे छत्रपती यांची भूमिका शांत राहण्याची असली तरी ती भाजपाला मान्य नाही. या प्रश्नावर अजित पवार, शरद पवार यांनी लढण्याची भूमिका घेतली तरी मी त्यांच्यासोबत असेन, असंही ते म्हणाले.
काँग्रेसच्याच पुण्याईवर आपला देश अजून चालत असून मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकार वर घणाघाती टीका केली. तसेच मोदी सरकारच्या काळात नवीन काही झालेलं नाही, पण आपण अपेक्षा करु शकतो असंही त्यानी म्हंटल.







