मुंबई (वृत्तसंस्था) – देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेची Mumbai Municipal Corporation पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणे अपेक्षित आहे. पण कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही निवडणूक कशा पद्धतीने घेतली जाणार ? निवडणूक पुढे ढकलली जाणार का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष यू.पी.एस.मदान यांनी मुंबई महापालिकेच्या Mumbai Municipal Corporation अधिकाऱ्यांसोबत बैठक होत आहे. याबैठकीत काय निर्णय होतो, याकेड सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होणार आहे. मागील अनेक वर्षापासून मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. राज्यात शिवसेनेने भाजप सोबतची युती तोडल्यामुळे भाजपने मुंबई महानगरपालिकेच्या Mumbai Municipal Corporation चाव्या काबीज करण्यासाठी जोरदार तयारी सरु केली आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची निवडणूक वेळेवर होणार की नाही किंवा तिला मुदतवाढ मिळून ती पुढे ढकलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई महानगरपालिकेने राज्य निवडणूक आयोगाला यासंदर्भात पत्र लिहिले होते. मुंबई महापालिका आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी 2021 मध्ये होणार आहे. निवडणूकीसाठी जवळपास 9 महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मात्र, सध्या कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेता सुरक्षेच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन त्याची आतापासूनच तयारी करण्यास पालिकेनं सुरुवात केली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हाहाकार उडाला होता. मात्र, राज्यासह मुंबईत कोरोनाची लाट ओसरताना दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती बिकट झाल्यास महापालिकेच्या निवडणूका वेळेत होणार की पुढे ढकलणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांसोबत आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लंक्ष लागून राहिलं आहे.







