नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – डॉ. रेड्डीजने डीआरडीओच्या DRDO 2 डीजी (2DG) अँटी-कोविड 19 औषधाची किंमत 990 रुपये प्रति पाऊच ठरवली आहे. फार्मा कंपनी, सरकारी हॉस्पिटल, केंद्र आणि राज्य सरकारांना हे औषध सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जाईल. निर्मात्यांनी गुरुवारी अँटी कोविड औषध 2-डीजीचा दुसरा साठा जारी केला. डीआरडीओच्या DRDO अधिकार्यांनी 26 मे रोजी म्हटले होते की, 2डीजी (2DG) औषधाच्या 10,000 पाऊचची दुसरी बॅच 27 मे रोजी डॉ. रेड्डीज लॅब जारी करेल.

अधिकार्यांनी म्हटले की, औषध आता व्यावसायिक प्रकारे उपलब्ध होईल. या महिन्याच्या सुरुवातीला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) ने कोविड रुग्णांवर या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजूरी दिली होती. औषधाला मंजूरी अशावेळी दिली आहे, जेव्हा देश कोरोनाच्या दुसर्या लाटेचा सामना करत आहे. दुसर्या लाटेत ऑक्सजीनच्या कमतरतेमुळे रूग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले, ज्यामध्ये दररोज हजारो रूग्णांना जीव गमवावा लागला. लाँचच्या वेळी मंत्रालयाने म्हटले होते की, या औषधाच्या मदतीने किंमती जीवन वाचवले जाऊ शकते.
हे औषध संक्रमित पेशींवर परिणाम करते. यामुळे संक्रमित रूग्ण बरे होतील. औषध हॉस्पिटलमध्ये दाखल राहण्याचा कालावधी सुद्धा कमी करू शकते. हैद्राबादच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीने हे औषध बनवले आहे.
या औषधाचा वापर मुख्य उपचारात मदत करण्यासाठी केला जाईल. 2-डीजी औषध पावडरच्या रूपात पॅकेटमध्ये येते, यात पाणी मिसळून प्यायचे आहे. हे औषध सकाळी-संध्याकाळ घ्यावे लागेल, असे सांगितले जात आहे.
जेव्हा हे औषध 2-डीजी रूग्णाच्या शरीरात जाते तेव्हा ते व्हायरसद्वारे संक्रमित पेशींमध्ये जमा होते. ज्यानंतर हे ड्रग व्हायरस सिंथेसिस आणि एनर्जी प्रॉडक्शन करून संसर्गाला वाढण्यापासून रोखते.







