मुंबई (वृत्तसंस्था ) – महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल आहे. पण आता चंद्रकांत पाटील यांनाच स्वप्ने बघण्याचा छंद आहे, त्यावर मी काय बोलणार?,अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. ‘महाराष्ट्र झोपेत असतानाच महाविकास आघाडी सरकार जाईल. कळणारचं नाही, कधी गेलं,’ असं म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचलं होतं.

चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या विधानासह मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपावर पलटवार केला. पाटील यांनी विधानावर ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल आहे. चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?,’ असं म्हणत जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.
जलसंधारण मंत्री जयंत पाटील हे आज (२८ मे) पुण्यात बैठकीसाठी आले होते. साखर संकुलात झालेल्या बैठकीनंतर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर पलटवार केला. महाविकास आघाडी सरकारवर चंद्रकांत पाटील सतत विधानं करीत आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व आलबेल आहे. चंद्रकात पाटील यांना स्वप्न पडण्याचा छंद आहे. त्यावर मी काय बोलणार?,’ असा टोला लगावला.
‘राज्याचं अधिवेशन घेण्याची यांच्यात हिम्मत नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. पाटील यांच्या विधानांवर जयंत पाटील यांनी टीकास्त्र डागलं. ‘पंतप्रधान मोदी यांच्यात देखील अधिवेशन घेण्याची हिम्मत आहे की नाही. यावर चर्चा होऊ शकते. कोरोना असल्याने लोकप्रतिनिधी येऊ शकत नाही. संख्या वाढल्याने अधिवेशन आपण मर्यादित केले आणि तेच कारण राज्याला लागू आहे. सर्व राज्यात हीच परिस्थिती आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले. कोरोना आहे त्यामुळे पंतप्रधान आणि लोकसभेचे सदस्य एकत्र येऊ शकत नाहीत. हीच परिस्थिती देशातील सर्व राज्यांना लागू आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आपण अधिवेशन घेणं थांबवलं आहे, असं ते म्हणाले.







