• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? – डॉ. संजय लाखे पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था ) – पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारासाठी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवून कोट्यावधी लोकांचे आरोग्य धोक्यात घालणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गलथानपणामुळेच देशात कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातील २१ पेक्षा जास्त जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असताना मराठा आरक्षणासाठी लोकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा अन्यथा वेळ जाईल असे म्हणून लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करणा-या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का? असा संतप्त सवाल करून स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी भाजप नेत्यांनी छत्रपती संभाजी राजेंवर दबाव टाकण्याचे पाप करू नये, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी दिला आहे.
यासंदर्भात बोलताना डॉ. लाखे पाटील म्हणाले की, भाजपच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकार आणि मोदी सरकारमुळेच मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. याचा राजकीय फटका आपल्याला बसू नये म्हणून वारंवार खोटे बोलून आपल्या पापाची जबाबदारी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील नेते करत आहेत. राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये कोरोना रूग्णवाढीचा दर सरासरीपेक्षा जास्त असल्याचे राज्याच्या मंत्रीमंडळासमोर ठेवलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे . तरीही आपल्या राजकीय स्वार्थासाठी विनायक मेटेंसारख्या बुजगावण्यांना पुढे करून मराठा आरक्षण आंदोलनाच्या नावाखाली लाखो लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्याचा कुटील डाव भाजपने रचला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आता मराठा समाजाला आरक्षण केंद्र सरकार, पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीच देऊ शकतात. भाजपला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर त्यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. पण भाजपला मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही तर मराठा समाजाचा वापर करून राज्य सरकारला बदनाम करण्याचा व आपला राजकीय स्वार्थ गाठायचा आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिचे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे पण त्यासाठी चंद्रकांत पाटलांनी दाखवलेला मार्ग राज्याला उत्तर प्रदेशातील गंगाघाटाच्या दिशेने घेऊन जाणारा आहे.


 

 

Previous Post

पंतप्रधानांमध्ये अधिवेशन घेण्याची हिंमत आहे की नाही? – जयंत पाटील

Next Post

जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अपघातात जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्हा रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी अपघातात जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कै. मीराबाई अर्जुन पाटील यांचे निधन
खान्देश

कै. मीराबाई अर्जुन पाटील यांचे निधन

November 4, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
खान्देश

यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या

November 4, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी
Uncategorized

मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची भडगाव तालुक्यात क्षेत्रीय भेट; जलतारा उपक्रमाचे उद्घाटन आणि सोजत गोट फार्मची पाहणी

November 4, 2026
अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई
Uncategorized

अनधिकृत गोठे, अतिक्रमण, अस्वच्छतेवर दंडात्मक कारवाई

November 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कै. मीराबाई अर्जुन पाटील यांचे निधन

कै. मीराबाई अर्जुन पाटील यांचे निधन

November 4, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

यावलमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा दाबून हत्या

November 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon