जळगाव ( प्रतिनिधी ) ;-कडक निर्बंध लागू केल्यापासून कोरोना आजाराचा फैलाव कमी होऊ लागल्याने रुग्ण संख्याही कमी व्हायला लागली असून आज जिल्ह्यात ३६२ बाधित रुग्ण आढळले असून ८५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याची दिलासादायक चित्र दिसून येत आहे. ९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे
जळगाव शहर-३३, जळगाव ग्रामीण- २८, भुसावळ-४२, अमळनेर-३२, चोपडा-३१, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१४, यावल-२५, एरंडोल-२, जामनेर-२७, रावेर-८, पारोळा-७, चाळीसगाव-६९, मुक्ताईनगर-१९, बोदवड-१७ आणि इतर जिल्ह्यातील ४ असे एकुण ३६२ बाधित रूग्ण आढळले आहे.