मुंबई (वृत्तसंस्था) – सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीमुळे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन अंतर्गत सर्व व्यवसाय आणि उद्योग धंदे बंद आहेत. परिणामी अनेक लोक एकवेळ अन्न किंवा पोटाला चिमटा काढून दिवस काढत आहेत. अश्यावेळी अभिनेता सोनू सूद आपल्या परीने शक्य तितकी सर्वप्रकारची मदत गरजू लोकांना करतो आहे. यामुळे त्याच्याप्रती आदर आणि कृतज्ञता दर्शविण्यासाठी नुकताच आंध्रप्रदेशातील श्रीकलाहस्ती मध्ये त्याच्या फोटोला हार घालून दुग्धाभिषेक करण्यात आला होता. हा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. त्यात अभिनेत्री कविता कौशिकचाही समावेश आहे. याबाबत तिने चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
अभिनेता सोनू सूद गेल्या वर्षीपासून कोरोना काळात गरिबांना मदत करतो आहे. लोक त्याला अक्षरशः देव मानत आहेत. यामुळे आंध्रप्रदेशातील श्रीकलाहस्ती येथे चाहत्यांनी सोनू सूदच्या फोटोला हार घालून त्यावर दुधाचा अभिषेक केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री कविता कौशिक चांगलीच संतापली आहे. कविताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चांगलाच संताप व्यक्त केला आहे. तिने ट्विटरहॅण्डलवरून याबाबत बोलताना लिहिले कि, ‘आपण सगळेच सोनू सूदवर प्रेम करतो. संपूर्ण देश सोनू करत असलेल्या निस्वार्थ कामासाठी कायम त्याचा ऋणी राहील. परंतु, मला या गोष्टीची खात्री आहे की, जिथे एकीकडे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि लोक भुकेने मरत आहेत, तिथे सोनूदेखील अशा प्रकारे दुधाची नासाडी पाहून दुखी होईल. हे मूर्खपणाचं काम आहे. यातून पुढील पिढ्या कोणताही आदर्श घेऊ शकत नाहीत.