• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवा – पालकमंत्री अजित पवार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2021
in भारत, महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन पुणे, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट करुन न घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या तसेच रुग्णांसाठीच्या औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

कोविड सेंटरमध्ये आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार पद्धतीचे पालन, वैद्यकीय सुविधा आदी बाबींची पाहणी व नियंत्रण यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव कोरोना रुग्णांमध्ये वाढत आहे. या रोगासाठीच्या औषधांच्या पुरवठ्यामध्ये गैरप्रकार होऊ नये तसेच रुग्णालयांना औषध पुरवठा सुरळीत होण्यासाठी या औषधांचे नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत आहे. कोरोनातून बरे झालेल्या नागरिकांना म्युकरमायकोसीस अथवा अन्य काही लक्षणे जाणवतात का, याची माहिती दूरध्वनीवरून घेण्यात यावी, जेणेकरून वेळेत उपचार होतील असेही सांगितले.

कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांना लस देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यावर भर देण्यात येत असून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावर १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णदर कमी असल्याचे दिसून येत आहे, ही दिलासादायक बाब आहे. तथापि, मृत्युदर नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. लहान मुलांसाठी पुरेशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवा. ऑक्सिजन पुरवठा, बेड उपलब्धता तसेच म्युकर मायकोसिस आजारावरील औषध पुरवठा, लहान बालकांसाठी आवश्यक उपाययोजना, वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


 

 

Previous Post

दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात २-३ दिवसांत निर्णय घेणार! – मुख्यमंत्री

Next Post

तरी आपण महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या असे कसे म्हणता? – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तरी आपण महाराष्ट्राला जास्त लसी मिळाल्या असे कसे म्हणता? - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon