१० जणांचा मृत्यू ; ६७५ जणांची कोरोनावर मात
जळगाव ( प्रतिनिधी ) ;- सध्या जिल्ह्यात कोरोनाचे कडक नियम लागू असल्याने कोरोना रुग्णांचा ‘ग्राफ’ आता उतरायला लागला असून आज दिवसभरात जिल्ह्यात ३५७ रुग्ण नव्याने आढळले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे . तसेच ६७५ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
जळगाव शहर-४४, जळगाव ग्रामीण-२६, भुसावळ-४७, अमळनेर-१५, चोपडा-४७, पाचोरा-४, भडगाव-५, धरणगाव-२, यावल-१०, एरंडोल-०, जामनेर-१३, रावेर-२०, पारोळा-९, चाळीसगाव-३९, मुक्ताईनगर-४०, बोदवड-२९ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण ३५७ रूग्ण बाधित आढळून आले आहे.