• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा ‘शेरनी’ लवकरच होणार प्रदर्शित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 17, 2021
in भारत, महाराष्ट्र, सिनेमा
0

नवी मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर आता लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. विद्या बालन लवकरच तिचा नवा चित्रपट ‘शेरनी’च्या माध्यमातून एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा हा नवा लूक नुकताच प्रेक्षकांसमोर आला आहे. अमित मसुरकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर अबंडाँटिया एंटरटेनमेंट यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाविषयी निर्माते विक्रम मल्होत्रा आणि टी सीरिजचे निर्माते भूषण कुमार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘शेरनी’ या चित्रपटाचे कथानक अत्यंत खिळवून ठेवणारे आहे. या चित्रपटात विद्या बालन एका निश्चयी अधिकाऱ्याच्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटासंदर्भात बोलताना निर्माते विक्रम मल्होत्रा म्हणाले की, ‘२०२० मध्ये ‘शकुंतला देवी’ या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव झाला. इतक्या यशानंतर अबंडाँटिया एंटरटेनमेंटची नवीनकोरी कलाकृती जगासमोर घेऊन जाताना पुन्हा एकदा अमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि टी-सिरीजसोबत भागीदारी करताना मला मनापासून आनंद होतो आहे.

पुढे, आम्ही काम करत असलेल्या ‘शेरनी’ चित्रपटाचे कथानक फार विशेष आणि महत्त्वाचे आहे. विषयाला समर्पकता प्राप्त करून देण्यासाठी अमितची कायमच मार्गदर्शक भूमिका लाभली आहे. व्यंगात्मक टिप्पणी ही त्याची मुख्य शैली आहे. जी सिनेमाला अधिक रोमांचक करते. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा चित्रपट म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे’

तसेच चित्रपटाबाबत बोलताना टी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले, ‘शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी खूप आनंदी आहे. विक्रम समवेत काम करणे कायमच आनंददायक असते. अबंडाँटिया एंटरटेनमेंट’सोबत आणखी मनोरंजक व हटके कथांवर काम करण्यासाठी मी यापुढेही उत्सुक आहे’.

अभिनेत्री विद्या बालनचा ‘शेरनी’ हा आगामी चित्रपट पुढील महिन्यात म्हणजेच जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच हा चित्रपट संपूर्ण जगभरात अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर स्वरूपात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर तिच्यासह शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी हे कलाकार अन्य मुख्य भूमिकांत दिसणार आहेत. या चित्रपटाचे कथानक अत्यंत रंजक असून प्रेक्षकांना एका जागी खिळवणारे आहे.


 

 

Previous Post

किती लोकांना मोदीजी अटक करणार ते बघुयाच ; नवाब मलिक यांचं आव्हान

Next Post

ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे न लावल्यास कारवाई -श्याम लोही

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऑटोरिक्षात पारदर्शक पडदे न लावल्यास कारवाई -श्याम लोही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी
1xbet russia

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:
1xbet russia

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय भूकंप:

May 8, 2026
मद्याची सवय जडलेल्या तरुणावरील उपचाराला मिळाली दिशा
1xbet russia

आरोहण २०२६ ची सुरुवात कुरुक्षेत्रच्या भव्य उद्घाटनाने

May 8, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

जळगावात १६ मे रोजी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. शरद साळोखे यांची रोबोटिक सांधेरोपण ओपीडी

May 9, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

नवापूरात ‘बर्ड फ्लू’ची धास्ती; जळगाव मनपा अलर्ट मोडवर

May 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon