नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्यात करोना व्हायरसने थैमान घालण्यास सुरुवात आहे. आज केवळ मुंबईत ४४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यात एकूण करोनाग्रस्तांची संख्या १०७८ झाली आहे. आकडेवारीनुसार, मुंबईत ४४, पुण्यात ९, नागपूरमध्ये ४, अहमदनगर, अकोला आणि बुलढाणामध्ये प्रत्येकी एक असे एकूण ६० नवे रुग्ण राज्यभरात आढळून आले आहेत. यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियामध्ये अनेक अफवा पसवल्या जात आहेत. याला काही लोक सोशल मीडियावर विरोधही करत आहेत. कोरोनावरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे की, ‘कोणत्याही योजनेशिवाय लागू केलेला लॉकडाऊन आणि कोरोनापासून नवे शिकाऊ असल्याप्रमाणे टीका टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, भाजपाच्या प्रचारकांना माहीत पाहिजे की, ते व्हॉट्सअॅप फॉरवर्डच्या माध्यमातून कोरोनाव्हायरसला हरवू शकत नाहीत, मुस्लिमांना बळीचा बकरा बनवणे, हे कोरोना व्हायरसवरील औषध नाही किंवा हा उपलब्ध टेस्टिंगचा पर्याय होऊन शकत नाही…’ कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या टीकेपासून वाचण्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, असा आरोप असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे.