मुंबई (वृत्तसंस्था) – अवघा देश कोरोनाचा संकटाचा सामना करत आहे. अशातच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाला आता मधुमेह, हृदयरोगाची समस्या जाणवत आहे. इतकंच नाही तर कोरोना संक्रमणा दरम्यान आणि त्यातून बरे झाल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना भूक कमी झाल्याची समस्या निर्माण झाली आहे. तर काहींची भूक संक्रमणादरम्यान किंवा कोरोनातून बरे झाल्यावर वाढली आहे. म्हणजे हे लोक अधिक जास्त खात आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अनेक रूग्णांमध्ये रिकव्हरी झाल्यावरही अधिक भूक लागणे आणि जास्त खाण्याची समस्या दिसून आली होती. परिणामी अनेक रुग्णांचे एका महिन्यातच 8 ते 10 किलो वजन वाढले आहे.
आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीची दिर्घ काळ भूक वाढलेलीच दिसत असेल तर ‘हे’ डायबिटीस किंवा एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. रिपोर्टनुसार, कोरोना संक्रमणातून ठीक झाल्यावर जास्त भूक लागणे किंवा जास्त खाणे हा एक आजार आहे, असे होत असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. लखनौ येथील केजीएमयूमधील एका डॉक्टराच्या मतानुसार, कोरोनाने सर्वाधिक रुग्णांची वास घेण्याची क्षमता नष्ट होते. त्यामुळे रुग्ण ठीक झाल्यावर ही समस्या दूर होते. त्यावेळी रूग्णाचा मेंदू त्याला जास्त खाण्याचा संकेत दित असतो.
2 ते 4 दिवस अस होत असल्यास ही सामान्य बाब आहे. भूक वाढण्याची समस्या कोरोनाच्या गंभीर रूग्णांमध्येच नाही तर कमी लक्षण असलेल्या किंवा लक्षण नसलेल्या रूग्णांतही दिसून येत आहे. याचे कारण असे आहे की, संक्रमणादरम्यान शरीर व्हायरससोबत लढत असते. त्यानंतर संक्रमण दूर झाल्यावर शरीराची कमजोरी वाढत असल्याने भूक वाढत असते, असे ते म्हणाले.