मुंबई (वृत्तसंस्था) – पुणे-पिंपरी-चिंचवड पाठोपाठ आता बारामतीमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बारामतीत आता करोना रुग्णांची संख्या सहा झाली आहे. आज दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ते दोघीही लहान मुली आहेत. यात एक वर्षाची व दुसरी आठ वर्षांची मुलगी आहे.
सगळ्यात पहिले रिक्षाचालाकाला करोनाची लागण झाली होती. तर या रिक्षाचालकांच्या संपर्कात आलेलेल्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्याने बारामतीकरांना मिळालेला दिलासा अल्पसा ठरला.कारण सोमवारी (दि.6) एका भाजीविक्रेत्याला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल होते. तर त्याच्या संपर्कातील 12 पैकी दोघांना मंगळवारी (दि.7) तर अन्य दोघांचा बुधवारी (दि.8) करोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.यात भाजीविक्रेत्यांची एक वर्षाची व आठ वर्षाची नातीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बारामतीकरांचे धाबेदणाणले असून आता बारामती शहरातही कर्फ्यू लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.