जळगाव ;- तालुक्यातील कंडारी येथील एका मजूराच्या १६ हजार रूपये किंमतीच्या तीन बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कंडारी येथील मजूर आकाश लक्ष्माण परदेशी (वय-२६) हा बकऱ्या चारून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात . कंडारी गावाच्या बाहेरील गाडेगाव रस्त्यावरील तांड्यावर सर्व बकऱ्या बांधून ते निघून गेले. . रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १६ हजार रूपये किंमतीच्या तीन बकऱ्या चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परिसरात शोधाशोध करून बकऱ्या मिळाल्या नाही. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण ढाके करीत आहे.