जळगाव ;-लॉकडाउनच्या काळात अवघ्या २ महिन्यात पारदर्शकपणे १५ दुचाकी चोरणारा ‘पारदर्शी ‘ नामक सराईत चोरट्याचा पर्दाफाश झाला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला पिपळगांव बु येथुन पहुरकडे येत असतांना त्यास होरी फाटयाजवळ अटक केली. सर्व दुचाकी जळगाव शहरातून चोरल्याची त्याने कबुली दिली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव जिल्हयात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना सुचना केल्या होत्या.त्यानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख,किशोर राठोड, विनोद पाटील, रणजित जाधव, उमेशगिरी गोसावी, वसंत लिंगायत,महेश महाजन ,अशोक पाटील, मुरलीधर बारी यांचे पथक रवाना केले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गोपनिय माहिती मिळाली की,जामनेर तालुक्यातील पिपळगांव बु येथील २० वर्षीय पारदर्शी हा तरुण जळगाव शहरात येवुन मोटार सायकली चोरुन घेवुन जात आहे. त्या अनुषंगाने वरील पथक हे सुमारे चार ते पाच दिवसापासुन पिपळगांव बु येथे जावुन थांबले होते.
मोटार सायकल चोरटा पारदर्शी उल्हास पाटील वय – २० रा.पिपळगांव बु.ता.जामनेर हा पिपळगांव बु येथुन पहुरकडे येत असतांना त्यास होरी फाटयाजवळ त्यास मोटार सायकलसह ताब्यात घेतले असता सदर मोटार सायकल हा चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यास अधिक विचारपुस करता त्याने लॉकडॉउनचे काळातील मागील दोन महिण्यात जळगाव शहरातुन चोरी केलेल्या मोटार सायकल बाबतची कबुली दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशन ६ गुन्हे ,
जिल्हापेठ पोलीस स्टेशन ७ गुन्हे , जळगाव शहर पोलीस स्टेशन – १ गुन्हा, शनिपेठ पोलीस स्टेशन १ गुन्हा असे एकुण १५ गुन्हयांची कबुली दिलेली आहे.