मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोना जिल्ह्यात दाखल होऊन न देण्यास प्रशासनाला मोठे यश आले होते. मात्र एकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या सर्वत्र जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सीमा बंद केल्या तरी देखील बीड जिल्ह्यात कोरोना या रोग आणि अखेर प्रवेश केला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील पिंपळा या गावात एक रुग्ण आढळून आला आहे. यामुळे आष्टीसह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून आता जिल्ह्यात इतर ठिकाणी धोरणाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कलम 144 नुसार पिंपळगाव परिसरातील तीन किलोमीटर कोंनटमेन्ट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. पिंपळा,सुंबेवाडी, धनगरवाडी,काकडवाडी,ढोबलसंगवी,खरडगव्हान असे एकूण सहा गावांना कोण टाइम झोनमध्ये जोडले आहे. तर कोंनटमेन्ट झोनच्या पुढील चार किलोमीटर अंतर असलेल्या गावात बुफ्फर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. यात लोणी, नांदूर, सोलापूर वाडी, कुंटेफल आणि कोयाळ पाच गावांचा समावेश असणार आहे. वरील सर्व गावे अनिश्चित कालावधीसाठी पूर्ण वेळ बंद करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संबंधित माहिती जिल्हाधिकारी यांच्या पत्रकानुसार निश्चित करण्यात आली आहे. एकूणच आता बीड जिल्ह्याला देखील सतर्क राहण्याची गरज आहे.