जळगाव ;- पश्चिम बंगाल येथे झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय हिंसाचार या ठिकाणी उसळला आहे. या हिंसाचारा मागे नव्याने सत्तारूढ झालेल्या तृणमुल कॉग्रेसचा हात असून संपूर्ण पश्चिम बंगाल राज्यात सूडबुद्धीने कट रचून निकाल लागल्यापासूनच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची हत्या, महिलांवर अत्याचार,सर्वसामान्य जनतेचे नुकसान पक्षाचे कार्यालय जाळपोळ करून एक प्रकारे सर्व सामान्य जनतेमध्ये भयाचे वातावरण निर्माण केले असून याच्या निषेधार्थ प्रदेश भाजप तर्फे आज.५ बुधवार रोजी जळगाव शहरात जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा)महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.
सकाळी १० वा.मुख्य बाजार पेठ असलेल्या दाणाबाजार चौक येथे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजूमामा) महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ममता बँनर्जी यांच्या निषेधार्थे नही चलेगी नही चलेगी ममता बँनर्जी तेरी दादागिरी नही चलेगी,राजकीय हिंसाचाराचा निषेध असो, ममता बँनर्जी चा धिक्कार असो अश्या घोषणा देवून निषेध करण्यात आला. तसेच भारत माता वंदे मातरमच्या जय घोषाने परिसर देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. या धरणे आंदोलन प्रसंगी स्थायीसभापती राजेंद्र घुगे पाटील,जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी,डॉ.राधेश्याम चौधरी,महेश जोशी नितीन इंगळे, प्रदीप रोटे,सुशील हासवाणी,उज्वलाताई बेंडाळे, अमित भाटीया, माजी महापौर भारतीताई सोनवणे,राजेंद्र मराठे,मनोज भांडारकर,विठ्ठल पाटील,प्रकाश पंडित,अक्षय चौधरी,धीरज वर्मा, नगरसेविका दीपमाला काळे,चेतनाताई चौधरी,मंडल अध्यक्ष रमेश जोगी (शिवाजी नगर) ,परेश जगताप (सुभाष चौक) ,किसन मराठे(अजिंठा चौफुली),केदार देशपांडे (गणेश कॉलनी), अजित राणे(प्रभात चौफुली),संजय लुल्ला(सिंधी कॉलनी ,विनोद मराठे(मेहरूण),निलेश कुळकर्णी(संभाजी चौक ,युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे (आकाशवाणी चौक),महिला अध्यक्ष दिप्तीताई चिरमाडे,(पुष्पलता बेंडाळे चौक,ओबीसी आघाडी जयेश भावसार (घाणेकर चौक)व्यापार आघाडी अशोक राठी (कृषी उत्पन्न बाजार),केमिस्ट आघाडी निशिकांत मंडोरे यांनी आपापल्या परिसरात झालेल्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व केले.या आंदोलनात सोशल डीस्टसिंग चा पालन करून या ठिकाणी धरणे आंदोलन केले. सुभाष शौचे,रेखाताई वर्मा,नितू परदेशी,तृप्ती पाटील,पिंटू काळे,अतुल हाडा संजय चौधरी,अनिल जोशी,चेतन तिवारी मिलिंद चौधरी महेश पाटील, अक्षय जेजुरकर सचिन बाविस्कर,रियाज शेख,जैन चव्हाण गौरव पाटील,विनय बाहेती,निर जैन,नाना देशमुख,आबा बाविस्कर,प्रतिक कासार,मनीष ओझा, प्रकाश दोडिया, मनोज नागला, सतीश सोनवणे,निलेश चव्हाण,रामेश्वर जोगी,संजय मतानी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोशल डीस्टसिंग पाळून कार्यकर्ते सहभागी झाले