पाचोरा (प्रतिनिधी) – मराठा आरक्षण चा निकाल ज्या पद्धतीने आरक्षण दिले गेले त्याची पध्दतीचा अभ्यास करता असे होणारच होते. महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण खुप गरजेचे आहे . यासाठी राणे समितीच्या त्रुटी यात राज्य मागास आयोगाची शिफारस नव्हते म्हणून आरक्षण टिकु शकले नव्हते. त्यानंतर फडणवीस यांच्या काळात हीच चुक दुरुस्त करुन नवीन आरक्षण देण्यात आले. याला सर्वोच्च न्यायालयात बाधा आली. यावेळी राज्य सरकारने जी बाजु मांडली त्यांच्या सोबत केंद्राने देखील बाजु मांडली पाहिजे होती. पंरतु आरक्षणाकडे राजकीय दिशेने बघितले गेले. काल परवाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी ला वेगळ्या पद्धतीने वापर करु असे सुचक विधान केले होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा योगायोग तर नाही. निकालामुळे मराठा समाजाच्या युवकांनी संयमाने घेतले पाहिजे. जर भाजपा ला खरच मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर केंद्राने जसे स्वतः साठी वेळोवेळी घटनेत बदल केला तसे आता देखील करावे अशी मागणी राज्य समन्वयक , मराठा क्रांती मोर्चाचे सचिन सोमवंशी यांनी केले आहे.