जळगाव ;- रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सतर्फे महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांना व्हिटामीनच्या गोळ्या, सॅनीटाझर, मास्क आणि कॅपचे वाटप आज सकाळी ११ वाजता गांधी मार्केट परिसरात करण्यात आले.
रोटरी क्बलतर्फे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे व महापालिका उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक असलेले सी-झेड व्हिटामिनच्या टॅबलेट, सैनीटायझर व मास्कचे ९०० किट बनवून महापालिका कर्मचारी, अधिकारी आणि शहरातील सर्व पोलिस स्टेशन व पाळधी येथील पोलिस स्टेशनमधील संपूर्ण पोलिसांना वाटण्यात आले. यावेळी सगळ्यांनी क्लबचे आभार मानले. यावेळी अध्यक्ष धनराज कासट , आयपीपी सागर मुंदडा, जीनल जैन, चंदन तोषणीवल हर्षल कटारिया, हितेश सुराणा, करण ललवाणी, रोहित आहुजा यांनी परिश्रम घेतले.








