जळगाव ;- जेनेरिकार्ट मेडिसिन प्रा.लि.हि कंपनी जेनेरिक व्यवसायातील एक अग्रगण्यकंपनी असून त्यांनी नवीन अँप्लीकेशन लाँच करून जास्तीत जास्त रुग्णांना मेडीसीनची सुविधा घरपोच मिळावी या करिता १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताचे औचित्य साधून सेवेचा शुभारंभ आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांच्या हस्ते करण्यात आल. आ. सुरेश भोळे (राजूमामा) यांनी विनोद व्यास जिल्हा प्रमुख मेडिसिन अँप यांना शुभेच्छा दिल्या.ह्या अँप चे फायदे आपल्या जवळचे जेनेरिकार्ट स्टोअर, जेनेरिकार्ट च्या औषधामुळे होणारी मासिक बचत जाणून घ्या,दैनंदिन औषधांचा रिमाइंडर सेट करा, जेनेरिकार्ट मेडिसिन मोबाईल हे फायदे आहेत
या प्रसंगी जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी नगरसेविका उज्वला बेंडाळे,गायत्री राणे,कुमार सिरामे,मंडल अध्यक्ष अजित राणे,जिल्हा प्रसिद्धी मनोज भांडारकर आदी.कार्यकर्ते उपस्थित होते