यावल;- तालुक्यातील थोरगव्हाण येथील ३८ वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येथे घडल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे
भानुदास मंगल चौधरी वय ३८ असे मयत शेकऱ्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी कि , अतुल गोपाल चौधरी रा. थोरगव्हाणयाने यावल पोस्टेला खबर दिली की थोरगव्हाण येथील भानुदास मंगल चौधरी वय 38 धंदा शेतकरी याने २ रविवार रोजी रात्री ८ वाजेच्या पूर्वी मनवेल शिवारातील त्याच्या शेताचे बांधावरील निंबाचे झाडास दोर बांधून आत्महत्या केली.याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय खैरनार करीत आहेत. दरम्यान मयताचे खिशात एक चिठ्ठी आढळून आली असल्याने चिठ्ठीमध्ये एका महिलेला जबाबदार धरण्यात यावे असे नमूद केले आहे.मयत व्यक्तीला एक ९वर्षीय मुलगा असून त्या मुलास व पतीस त्याची पत्नी सोडून गेल्याने वैफल्यग्रस्त शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे सुद्धा परीसरात बोलले जात आहे .