चाळीसगाव : कोरोना व्हायरसने जगात सर्वत्र थैमान घातले असताना आपले कर्तव्य चोख बजावत असलेल्या पोलीस बांधवांच्या सेवेची भावना लक्षात घेऊन अनिलभाऊ गोत्रे मित्र मंडळातर्फे चाळीसगावातील पोलीस अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांना पोलीस उपअधीक्षक कार्यालय, विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा या सर्व ठिकाणी N95 मास्क चे वाटप करण्यात आले . यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मा.श्री कैलास गावडे यांनी पोलीस बांधवांच्या काळजीपोटी देण्यात आलेल्या उच्च प्रतीच्या मास्क दिल्याबद्दल अनिलभाऊ गोत्रे मित्र मंडळाचे अनिल गोत्रे, प्रसाद चौधरी यांचे पोलीस बांधवांतर्फे आभार व कौतुक करण्यात आले.