नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- आज तक या वृत्तवाहिनी मध्ये वृत्त निवेदनाचा काम करणाऱ्या प्रसिद्ध वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं आज कोरोनामुळे दु:खद निधन झालं आहे. सुधीर चौधरी यांनी यासंबंधी ट्विट करत रोहित सरदाना यांच्या निधनाची बातमी समोर आणली आहे. रोहित सरदाना यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.








