जळगाव ;- जळगाव जिल्हा रूग्णालयासमोर आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका ६० ते ६५ वर्षीय वायोवृध्दाचा मयत स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नातेवाईकांनी ओळख पटविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे.

अधिक माहिती अशी की, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आज गुरूवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका अनोळखी ६० ते ६५ वर्षीय पुरूष वयोवृध्दाचा मयतस्थीतीत मृतदेह आढळून आला आहे.







