हाजीपुर (वृत्तसंस्था) – कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याने बिहारमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे, परंतु तुम्ही जर बाहुबली आहात आणि सत्ताधार्यांशी संबंधीत असाल तर तुमच्यासाठी नाईट कर्फ्यूचे बंधन नाही. असे आम्ही म्हणत नाही तर हाजीपुरातील लालगंजचे माजी आमदार आणि बाहुबली नेते मुन्ना शुक्ला यांनी जे केले आहे यावरून स्पष्ट होत आहे.

23 एप्रिलरोजी लालगंजचे माजी आमदार मुन्ना शुक्ला यांच्या पुतण्याचा उपनयन संस्कार सुरू होता. यानिमित्त शुक्रवारी रात्री भोजपुरीची सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी अक्षरा सिंहला बोलावण्यात आले होते. या दरम्यान रात्रीभर पार्टी चालली, कोरोना गाईडलाईनची ऐशी-तैशी करण्यात आली आणि नंतर येते जोरदार नाच-गाणे झाले.
या दरम्यान मुन्ना शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने सुद्धा जोरदार डान्स केला. शेकडो लोकांची गर्दी जमली होती परंतु जिल्हा प्रशासन हातावर हात ठेवून हे सर्व पहात होते. हिंदीपासून अनेक भोजपुरी गाणी वाजवण्यात आली, ज्यावर कोरोनाला विसरून लोक बेभान झाले होते. हा कदाचित सत्तेचे निकटवर्तीय आणि बाहुबली होण्याचा फायदा दिला जात होता.
इतकेच नव्हे, उलट बाहुबली नेत्याच्या बॉडीगार्डने सर्व मर्यादा पार करत पोलिसाच्या गणवेशात कार्बाइनने फायरिंग सुद्धा केली. हैराण करणारी बाब म्हणजे बहुतांश लोकांनी मास्क सुद्धा घातला नव्हता. हे व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट दिसत आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, बिहारमध्ये जी स्थिती आता आहे, ती पहाता अशा कार्यक्रमाचे आयोजन करून कोणता संदेश दिला जात आहे. या प्रकरणी म्हटले जात आहे की, पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. रिपोर्ट सोपण्यास सांगितले आहे.







