करुणा इंटरनॅशनलतर्फे महावीर जयंती निमीत्त ऑनलाइन व्याख्यान

अमळनेर ;- करोनामुळे मानवी समाज खूप हादरलेला आहे. सर्वत्र भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक झळकत असताना.आज महावीर जयंती चे ऑनलाइन आयोजन करण्यात आले. करुणा इंटरनॅशनल ही संघटना चेन्नई येथून त्यांच्या देशभरातील ४० केंद्रामार्फत कार्यक्रम आयोजित करते. ते केंद्र देश्यातिल २५०० शाळेत करुणा क्लब च्या माध्यमातून करुणा,अहिंसा,शाकाहार यावर कार्य करते.असेच जळगाव केंद्रा तर्फे महावीर जयंती चे आयोजन ऑनलाइन झाले. या ऑनलाईन व्याख्यानात दिल्ली येथून डॉ.इंदू जैन,पाली राजस्थान येथून डॉ.ललिता मेहता, चेन्नई येथून कैलाशमल दुग्गड,सुरेश कांकरिया,पदम टाटीया,जळगाव येथून बाफना ग्रुप चे कस्तुरचंद बाफना,अमळनेर येथून दिनेश पालवे बिकानेर येथून करुणा प्रचारक भुपेश चारण यांनी मार्गदर्शन केले.त्यावेळी जळगांव जिल्हयातील सर्व १५ तालुक्यातील करुणा शिक्षक व मुख्याध्यापक हजर होते.त्यात
गोकुळ बोरसे,प्रमोद चौधरी,नितीन कलंत्री,संदीप पवार,अनिल चौधरी,नरहर पाटील,सिमा साळुंके,नरेंद्र बाविस्कर,निक पाटील,भगवान सोनवणे,ललिता पालवे,अर्जुन परदेशी,मिलिंद वाघुळदे,अर्जुन परदेशी,नितिन मराठे हे करुणा अध्यापक उपस्थित होते. ऑनलाईन कार्यक्रम यशश्वीततेसाठी अमळनेर च्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल चे सहकार्य लाभले.







