जळगाव;- हिराशिवा कॉलनी, खोटे नगर येथील रहिवाशी भुषण प्रकाश राजपूत (वय-३६) रा.हे शहरातील कॅथलॅब टेक्नीशीयन म्हणून संजीवनी हॉस्पीटलमध्ये कामाला आहे.त्यांची दुचाकी (एमएच १९ डीएल २४४१) सुमारे ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी हॉस्पीटल समोर पार्कींग करून लावली. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही. दुचाकी चोरी प्रकरणी भुषण राजपूत यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे करीत आहे.








