जळगाव ;-येथील सुप्रीम कॉलनी परिसरात दारू पिण्यासाठी २० रूपये दिले नाही म्हणून राग आल्याने एकाने तरूणाला लोखंडी कैचीने वार करून गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत पंडीतराव साबळे (वय-२८) रा. गजानन महाजरा मंदीराच्या पाठीमागे सुप्रिम कॉलनी हा तरूण चालक असून मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. शुक्रवार २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रशांत हा रामदेवबाबा मंदीरासमोरून पायी जात असतांना बबल्या शेंड्या (पुर्ण नाव माहित नाही) रा. गजानन महाराज मंदीर श्रीकृष्ण नगर जळगाव हा दारू पिण्यासाठी प्रशांतकडे २० रूपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित आरोपी बबल्याने त्याच्या खिश्यातून लोखंडी कैची काढून प्रशांतवर वार करून जखमी केले. यात प्रशांत हा जखमी झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले. रात्री उशीरा प्रशांत साबळे यांच्या फिर्यादीवरून बबल्यावर एमआयडीस पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील करीत आहे.







