जळगाव;- जिल्हा पोलीस दल , जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैदयकीय महाविदयालय व इंडीयन रेडक्राùस सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचे कृटुंबाकरीता कोरोना -१९ लसीकरण केंद्र पोलीस मुख्यालयतील मल्टीपर्पज हॉल येथे कार्यान्वीत करण्यात आले.सदर लसीकरण केंद्रात पोलीस अधिकारी / कर्मचारी यांचे कृटुंबीयांना कोरोना लस दिली जाणार आहे.





सदर प्रसंगी पोलीस अधीक्षकडॉ . प्रविण मुंढे, सौ.डॉ .अमृता मुंढे, अपर पोलीस अधीक्षक.चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्यचिकीत्सक श्री.नागोजीराव चव्हाण,पोलीस उपअधीक्षक (गृह )डी.एम.पाटील, राखील पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षकरविंद्र गिरासे, राखील पोालीस उपनिरीक्षक भारत चौधरी तसेच जळगाव जिल्हा रुग्णालयातील सौ.जयश्री वानखेडे, इंडीयन रेडक्रास सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, डॉ.प्रसन्नकुमार रेसदाणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.







