जळगाव;- तालुक्यातील शिरसोली येथील राम मंदीर परिसरात सामाजिक कार्यकर्ते बबलू बारी यांच्यातर्फे आज श्रीराम जयंतीनिमित्ताने माजी सैनिक उत्तम बारी यांच्याहस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण सोहळा आज बुधवारी सकाळी पार पडला.

शिरसोली गावात गेल्या अनेक महिन्यांपासून गावात एकही रूग्णवाहिका नसल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच सध्या कोरोनाच्या काळात अनेक रूग्णांची हेळसांड होत असल्यामुळे वेळेवर उपचार मिळत नव्हते. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बबलू बारी यांच्यातर्फे गावाला नवीन रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने गावातील सरपंच व ग्रामस्थांनी अभार व्यक्त केले. याप्रसंगी गावाचे सरपंच प्रदीप पाटील व हिलाल बारी, उपसरपंच श्रावण तायउे, , विनोद भील, शिवदास काळे, पंचायत समिती सदस्य जयंत बारी, शिवदास बारी, राजू बारी, ग्रामपंचायत सदस्य प्रविण बारी, प्रशांत काटोले, नितीन बारी, प्रविण पाटील, राजू बारी, रवी नेटके, बबलू बारी, अतुल बारी आदी उपस्थित होते.







