• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लवकर पूर्ण करा -जिल्हाधिकारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2021
in क्राईम, जळगाव
0

जळगाव;- अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यातंर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी. अशा सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्यात.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी ऑनलाईन संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सदस्य तथा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड केतन ढाके, सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक (नाहसं) पी. एस. सपकाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रविंद्र गिरासे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी ऑनलाईन सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी श्री. राऊत म्हणाले की, पिडीतांना जलदगतीने न्याय मिळण्यासाठी सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ गुन्ह्यांचा तपास प्रलंबित राहणार नाही. याकरीता पोलीस विभागाने अशा गुन्ह्यांचा तपास प्राधान्याने करण्याच्या सूचना तपासी अधिकाऱ्यांना द्याव्यात. दोषारोप पत्र पाठविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. या बैठकीमध्ये श्री. राऊत यांनी न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांची माहिती घेऊन पिडितांना नियमानुसार अर्थसहाय्य तातडीने मंजूर करुन त्यांना देण्याच्या सूचना दिल्यात.
प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी माहे मार्च अखेर अनुसूचित जातीची 12 तर अनुसूचित जमातीची 12 असे एकूण 24 गुन्हे पोलीस तपासावर असल्याची माहिती बैठकीत दिली. त्यापैकी 16 गुन्ह्यांची निर्गती पोलीस विभागाने केली आहे. उर्वरित 8 व मार्च मध्ये नव्याने दाखल झालेले 3 असे एकूण 11 गुन्हे पोलीस तपासावर असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मार्च 2021 मध्ये 16 पिडीतांना मंजूर केलेले 18 लाख 39 हजार रुपयांचे अर्थसहाय्याची रक्कम पिडितांच्या बॅक खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती श्री. पाटील यांनी बैठकीत दिली.


 

 

Previous Post

उद्यापासून ७ ते ११ यावेळेतच दुकाने सुरु राहणार

Next Post

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कोरोना पॉझिटीव्ह

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी कोरोना पॉझिटीव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon