रावेर (प्रतिनिधी) – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यात शिव भोजनाची थाळी दरोरोज १५० व्यक्तीना देण्याचा आदेश केला आहे. उद्यापासुन याचा लाभ घेता येणार असल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले.

गरीब व गरजू जनतेला स्वस्त दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्यासाठी शिवभोजन योजना सुरु केलेली आहे. सद्य परिस्थितीत जळगाव जिल्हयासाठी एकूण ३५०० थाळीखपाचा उद्दीष्ट मंजूर करण्यात आलेला आहे. गरीब व गरजू व्यक्ती तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंजूर, स्थलांतरीत , बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींच्या जवेणा अभावी हाल आपेष्टा होऊ नये यासाठी गुरुवार दि.१५ एप्रिल , २०२१ पासुन पुढील एक महिन्यापर्यंत शिवभोजन थाळी नि : शुल्क उपलब्ध करुन देण्यात यावी तसेच शिवभोजन केंद्रांना यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या थाळी खपाच्या उद्दीष्ट दिड पट वाढ करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.







