• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेमडेसिवीर जास्त भावात विकतांना डॉक्टरला अटक ; पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 12, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

नाशिक (वृत्तसंस्था) – एकिकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले जात आहेत. तर दुसरीकडे कोरोनावरील महत्त्वाचे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यात तुटवडा जाणवत आहे. मात्र, रेमडेसिविरचा काळाबाजार करताना चक्क एका डॉक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉक्टरला बाराशे रुपयांचे इंजेक्शन तब्बल 25 हजार रुपायांना विकताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई रविवारी (दि.11) रात्री करण्यात आली. रात्री उशीरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ. रविंद्र श्रीधर मुळूक (वय-40) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरणारे रेमडेसिविर इंजेक्शन रुग्णांना मिळत नसताना डॉक्टरच याचा काळाबाजार करत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे.

देवळाली कॅम्प व शहरातील रुग्णालयात दाखल रुग्णासाठी तीन रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते हे शहरात फिरत होते. त्यावेळी त्यांना एक क्रमांक मिळाला. त्यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने त्या क्रमांकावरुन मोहिते यांना फोन आला. त्यात बाराशे रुपये किमतीचे रेमडेसिव्हिर प्रति इंजेक्शन 25 हजार रुपयांना देण्याचे ठरले. हे इंजेक्शन अमृतधाम परिसरात रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास देण्यासाठी संबंधित व्यक्ती आली. मात्र मोहितेंनी यांच्याकडे अवघे 16 हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यांनी संबंधितांना अमृतधाम परिसरातील अॅक्सिस बँकेच्या एटीएमवर बोलवले. यावेळी सद्गुरु हॉस्पिटलचे डॉ. रविंद्र मुळूक त्या ठिकाणी आले. डॉ. मुळूक येण्यापूर्वी या घटनेची माहिती मोहिते यांनी पोलिसांना दिली होती.

दरम्यान, एटीएमवर डॉ. मुळूक आले असता मोहिते यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या मित्राने ते आलेल्या वाहनाचे मोबाईलमध्ये फोटो काढले. ही बाब मुळूक यांच्या लक्षात येताच त्यांनी पैसे तिथेच टाकून वाहनात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी पोलीस त्या ठिकाणी आले. पोलिसांनी पाठलाग करुन डॉ. मुळूक यांना अडवून वाहनाची तपासणी केली. त्यावेळी वाहनामध्ये इजेक्शन मिळून आले. डॉ. मुळूक यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ मुळूक हे सद्गुरु हॉस्पिटलचे संचालक असून घटना घडली त्यावेळी ते दवाखान्यात नसल्याची माहिती त्यांचे सहकारी संचालक डॉ. भाबड यांनी दिली.


 

 

Previous Post

गुढीपाडवा सणासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; ‘हे’ आहेत नियम

Next Post

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील ‘चॅप्टर केस’ बंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखेर अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील 'चॅप्टर केस' बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड
1xbet russia

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणावर केले चाकूने वार
1xbet russia

चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला

February 22, 2026
पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

लग्नाला नकार दिला म्हणून तरुणीवर प्राणघातक हल्ला; संशयिताला अटक

February 22, 2026
डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

डॉ. अमित राणे यांची जपानमधील प्रतिष्ठित ‘WFVS’ फेलोशिपसाठी निवड

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon